नाशिकः पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला तब्बल १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता याचा समावेश आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी आयकर विभागाने छापे टाकले. यामध्ये सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. यादरम्यान आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली आहे. एवढी बेहिशोबी मालमत्ता बघून अधिकारीही यावेळी चकित झाले.
ही रक्कम मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास अठरा तास ही रक्कम मोजली. दरम्यान अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांनी या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- प्रशासनात अधिकाऱ्यांनी ‘हो’ आणि राजकारण्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकणे आवश्यक – मुख्यमंत्री ठाकरे
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

