नवी दिल्ली: फेसबुक भारतातील द्वेष पसरवणारी आणि चुकीची माहिती हाताळण्यात असमर्थ असल्याचे समोर आले आहे. ठरला आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. मात्र भारतामध्ये चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारावरील माहिती फेसबुक अपयशी झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे अमेरिकन माध्यमाच्या वृत्ताने म्हटले आहे.
सोशल मीडिया संशोधकांनी म्हटले आहे की असे गट आणि फेसबुक पेज आहेत जी द्वेष, भ्रम आणि समुदायविरोधी आक्रोश निर्माण करणाऱ्या गटांनी भरलेली आहेत.
न्यू यॉर्क टाईम्स आणि असोसिएटेड प्रेससह वृत्तसंस्थेने यासंदर्भात आपला अहवाल दिला आहे. फेसबुक कंपनी चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराच्या घटनांवर उत्सव साजरा करणाऱ्या घटना यांना हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने फेसबुकच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषांपैकी केवळ पाच भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सामग्रीचे विश्लेषण करण्याची सुविधा आहे, पण हिंदी आणि बंगालीचा आत्तापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. ही माहिती फ्रान्सिस होगेन यांनी दिली आहे. जे फेसबुकचे माजी कर्मचारी होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘शाहरुख खानने मलिक आणि राऊतांना रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी भाड्याने घेतलं असेल’
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- …म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
