🕒 1 min read
सिंधुदुर्ग : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील याप्रकरणी भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘जे दिशा सालियनच्या बाबतीत घडलं तेच पूजा चव्हाणच्या विषयात घडत आहे. पुरावेच जर नष्ट केले जातील तर आरोपीला कधीच शिक्षा होऊ शकत नाही. कोणाचा जीव घेऊन सुद्धा जर हे हरामखोर मंत्रिपदं मिरवणार असतील तर पोलीस स्टेशन आणि कोर्ट बंद करून टाका,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
जे दिशा सालियनच्या बाबतीत घडलं तेच पूजा चव्हाणच्या विषयात घडत आहे. पुरावेच जर नष्ट केले जातील तर आरोपीला कधीच शिक्षा होऊ शकत नाही. कुणाला ठार मारून सुद्धा जर हे हरामखोर मंत्रिपदं मिरवणार असतील तर बंद करून टाका पोलीस स्टेशन आणि कोर्ट. pic.twitter.com/69vIazFqGH
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 14, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आधारस्तंभ – संजय राऊत
- फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
- राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत
- IndvsEng : पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम स्थिती !
- उद्यापासून महाविद्यालये सुरु ; पुण्यात अभाविप करणार ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
