Share

..तर आज बाळासाहेबांनी संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती-चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई :  त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही हिंसक घटना घडल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले की, त्रिपुरात मस्जिद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटले, यापेक्षा मला संजय राऊतांचे वक्तव्य ऐकून खूप कीव येत आहे. राजकारणासाठी किती लाचार झालेत, हे दिसतेय. आज स्व बाळासाहेब जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती, असे कडक शब्दात चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर संताप व्यक्त केला आहे.

‘पाच टक्के मुस्लीम त्यांच्या नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक आंदोलन करतात त्यावर तुम्ही टीका पण करणार नाही का? प्रत्येक विषयात तुम्हाला भाजपाच दिसते. आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली. एसटी कामगारांवर इतका अमानवीय अन्याय महाराष्ट्राराने कधी पाहिला नाही. यामध्ये भाजपाचा हात असेल तर तुम्ही तिघे समर्थ आहात भाजपाचा हात कापून काढण्यासाठी. तुम्ही तिघे एकत्र असूनही दुबळे आहात आणि आम्ही श्रेष्ठ आहोत असे तुम्हाला म्हणायचे आहे.’

पुढे ते म्हणाले, ‘लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण शांततेने करा. अमरावतीमधल्या कालच्या घटनेचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्र्यांचे सामान्य माणसांची ऑफिस फोडली गेली. त्यामुळे भाजपाने नागरिकांच्या इच्छेमुळे बंदचे आवाहन केले होते. आज पोलीस लाठ्या चालवतील पण काल जी दुकाने फोडली त्यांच्यावर लाठ्या नाही चालवल्या’, असा सवाल देखील त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!