पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
राणेंना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, अद्यापही हा वाद कायम आहे. काही महिन्यांपूर्वी सेना भवन येथे भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष वाढलेला असतानाच गेल्या २ दिवसातील राड्यामुळे सेना-भाजप अधिक दुरावल्याचं दिसून येत आहे.
अशा वातावरणातही भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत सूचक विधान केला आहे. ‘मी भविष्यकार नाही पण सेना-भाजपमध्ये अशीच कटुता २०१४ साली होती. युती तुटल्यानंतर एकमेकांना खूप शिव्या दिल्या गेल्या. पण नंतर युतीचं सरकार स्थापन झालं. बरोबर कि चूक ते माहित नाही. आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले हसून मजा घेत आहेत. पण काही वेगळंही होऊ शकतं,’ असं विधान चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतून केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचा मार्ग मोकळा; ‘या’ तारखेला होणार परीक्षा, ऍडमिट कार्ड जारी
- ‘वरुण सरदेसाईंना ‘सरकारी भाचा’ म्हणून घोषित केले आहे का?’ ; मनसेचा सवाल
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’, नितेश राणेंच्या विधानाने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

