🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, अद्यापही हा वाद कायम असून आता नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे,’ असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. कालच्या राड्यानंतर युवा सेनेच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी युवासेना नेते वरुण सरदेसाई हे देखील हजर होते. या भेटीचा फोटो शेअर करत राणेंनी ट्विट केलं आहे.
So it was indeed a state sponsored violence just like West Bengal !
As a head of the state the CM shud be ensuring safety but he is actually felicitating hooligans!
State of affairs in Maharshtra!!
Presidents rule is the only way out to ensure safety from these thugs! pic.twitter.com/UH5RieArLo— Nitesh Rane (@NiteshNRane) August 25, 2021
‘याचा अर्थ पश्चिम बंगालप्रमाणे ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे,’ असं म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आज दुपारी ४ वाजता नारायण राणे यांची पत्रकार परिषद होणार असून सबंध राज्याचे लक्ष्य ते काय बोलणार याकडे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचा मार्ग मोकळा; ‘या’ तारखेला होणार परीक्षा, ऍडमिट कार्ड जारी
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
