मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त गट ब पूर्व परीक्षा लाटेमुळे रखडली होती. मात्र आता या परीक्षेसंबंधी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत आयोगाने आधीच परिपत्रक काढून परीक्षार्थींना याबाबत कळवले होते.
ही परीक्षा नियोजित तारखेनुसारच होणार असून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता या परीक्षेचे ऍडमिट कार्ड देखील जाहीर करण्यात आले आहे.
महत्वाचं म्हणजे ४ सप्टेंबरलाच संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा होणार असून आता वेळापत्रकात बदल होणार नाही, असं देखील सागंण्यात आलं आहे. पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांच पालन करून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भातील परीपत्रक जारी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फक्त राणे नव्हे, तर रावसाहेब दानवेंनेही अशीच भाषा वापरली’, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

