Share

‘वरुण सरदेसाईंना ‘सरकारी भाचा’ म्हणून घोषित केले आहे का?’ ; मनसेचा सवाल

Published On: 

मुंबई : ‘राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते.महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?’ असा संतप्त सवाल मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विचारून युवासेना नेता वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली आहे.

तसेच ‘तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितो? मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणारी आंदोलनांवर बंदी अशात ‘सरकारी भाचा’ सभा कसा घेऊ शकतो?, सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं म्हणून वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये?

जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर मेळावे होणार असतील तर सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये? जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर मेळावे होणार असतील ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये? जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार’आणि’मी जबाबदार’म्हणून जनतेवर करोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार’सरकारी भाच्या’वर इतकं उदार का?

कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना,मग वारंवार शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार ‘बेशिस्त भाच्याचा’ बंदोबस्त कधी करणार? कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना,मग वारंवार शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार ‘बेशिस्त भाच्याचा’ बंदोबस्त कधी करणार?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसणारा हा ‘सरकारी भाचा’ कोरोना नियमांना किंबहुना सरकारलाच जुमानत नाही का? सरकारला नातेवाईकांमधून कुणी आवाहन देत आहे का?’ असे संतप सवाल देखील त्यांनी यावेळी विचारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!