रत्नागिरी : गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते निलेश राणे यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवारांना स्वतःचे आमदार टिकवता आले नव्हते अशी जळजळीत टीका त्यांनी केली होती.
आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘फडणवीस शपथविधीच्या पहाटे काय घडलं ते अजून सांगत नाहीयेत जर सांगितलं तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही’ असा प्रहार त्यांनी केला आहे. ‘आपल्या शपथविधीला येणारा माणूस शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो त्यांच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जातं. तोच माणूस आज भाजपवर टीका करतो ती टीका का सहन करायची’ असा सवाल देखील निलेश राणे यांनी केला आहे.
तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रॉपर्टी लपवल्याचा आरोप केला होता. याचवरून ठाकरेंवर टीका करतानाच त्यांनी धंनजय मुंडे यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली आहे. ‘ प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत का?’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो’
- मुंबई महापालिका आता दहा सीबीएसई शाळा सुरू करणार
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- ‘बिग बॉस’ फेम स्वामी ओम यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

