Share

शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

Published On: 

मुंबई:- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.

शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे.

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना हिंदू समाजाबाबत अत्यंत अपमानकारक भाषा वापरली आहे. ‘आजचा हिंदू समाज सडला आहे’, अशा वाक्यांचा त्यात समावेश आहे. त्याने समाजात तेढ निर्माण करण्याच्या भावनेतूनच अशा प्रकारची भाषा वापरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या संविधानिक संस्थांविरोधातील ही भाषा म्हणजे राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचली आहे, असं पत्र चंद्रकात पाटील यांनी योगी आदित्यनाथांना पाठवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!