मुंबई : आज बृहन्मुंबई महापालिकेचे सन २०२१-२२ साठीचे बजेट सादर करण्यात आले आहे. यावेळी पालिकेच्या शाळांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेच्या शाळांचा चेहरा-मोहरा बदलून जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल याबाबत पावले उचलली जात आहेत.
दरम्यान, महापालिकेने दहा नव्या सीबीएसई शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी महापालिकेने २ सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु केल्या होत्या. आता, मुंबई शहरात 2, पश्चिम उपनगरात 3, तर पूर्व उपनगरात 5 अश्या एकूण 10 शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बजेटमध्ये पैशांची तरतूद केली गेली आहे.
आता पालिका शाळा नाही, तर ‘मुंबई पब्लिक स्कुल’ !
आता मुंबईतील सर्वच पालिका शाळांचा उल्लेख देखील नव्या पद्धतीने करण्यात येणार आहे. इथून पुढे पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जातील. हा निर्णय आज आशियायतील श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या बजेट सादरीकरणा दरम्यान घेण्यात आला आहे.
यंदा २९४५.७८ कोटींची तरतूद शिक्षण विभागासाठी करण्यात आली असून तितक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी २९४४.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी त्यात १.१९ कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर, महापालिका शाळांचं नवं नामकरण आणि लोगो बदलण्यावरच भर या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महापंचायत सुरु असताना राकेश टीकेत यांचा मंच कोसळला !
- राकेश टीकेत यांना शेतकऱ्यांचा तुफान प्रतिसाद, महापंचायतमध्ये तुटले गर्दीचे सगळे रेकोर्ड
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, धनजंय मुंडेंनी दिले ‘हे’ आदेश
- कोल्हापूरचा पठ्ठया आंतरराष्ट्रीय टॅक्सेशन परीक्षेत देशात अव्वल !
- ‘बिग बॉस’ फेम स्वामी ओम यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

