Share

‘…आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो’

Published On: 

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते निलेश राणे यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवारांना स्वतःचे आमदार टिकवता आले नव्हते अशी जळजळीत टीका त्यांनी केली होती.

आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर  नाव न घेता टीका केली आहे. ‘आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जाते, तोच माणूस भाजपावर टीका करतो आणि आपण सहन करायची का?’ असा सवाल करत निलेश राणे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झाले होते तेव्हा निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जळजळीत टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी, ‘ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’ अशा शब्दात समाचार घेतला होता. आता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य केल्यामुळे ते काय प्रत्युत्तर देणार हे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!