नवी दिल्ली : जेव्हापासून अमेरिकी पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केले आहे, तेव्हापासून अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे वळले आहे. आता तर अशी परिस्थिती ओढावली आहे की, ज्यांचा या आंदोलनाशी सुतराम संबंध नाही, अशा व्यक्तीही यावर प्रतिक्रिया देऊ लागल्या आहेत. या यादीत पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफा, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांचीही नावेत आहेत. मात्र, आता बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने ट्विट करून या सर्व सेलिब्रिटींना आरसा दाखवला आहे.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. ????????#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda https://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
अक्षय कुमारने परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या जबाबाचे समर्थन करत म्हटले की, शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे. उलट जी दरी रुंदावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda.
Don’t fall for any false propaganda against India or Indian policies. Its important to stand united at this hour w/o any infighting ????????#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 3, 2021
अक्षयने परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनाचे जाहीर समर्थन केले आहे. यानुसार भारत बाहेरच्या लोकांना त्यांचा अजेंडा कदापि राबवू देणार नाही. दुसरीकडे, मंत्रालयाने यानिमित्त अशा सेलिब्रिटींनाही इशारा दिला आहे, जे या संवेदनशील मुद्द्यावर उलटसुलट विधाने करत आहेत.
We must always take a comprehensive view of things, as there is nothing more dangerous than half truth. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda @hiteshjain33 https://t.co/7rNZ683ZAU
— Suniel Shetty (@SunielVShetty) February 3, 2021
अक्षयकुमार शिवाय अभिनेता अजय देवगन, सुनील शेट्टी, एकता कपूर आणि करण जोहर यांनीही याच मुद्द्यावर ट्वीट केले आहे. या सर्वांनीच एकजुटीचा संदेश देत बाहेरच्या लोकांनी चालवलेल्या प्रपोगेंडाच्या प्रभावात न येण्याचे आवाहन केले आहे.
Lets stand united against any propaganda. Together we can and we will! #IndiaAgainstPropoganda #IndiaTogether https://t.co/4PhlCCowz4
— Ektaa R Kapoor (@EktaaRKapoor) February 3, 2021
https://twitter.com/karanjohar/status/1356897467850059780
महत्वाच्या बातम्या
- व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून सोनपेठमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
- शरजील उस्मानी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
- कोरोना काळात सीसीटीव्हीच्या कामात मोठा गैरव्यवहार : आमदार मुदंडा
- जाणून घ्या : स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे तुमच्या वाहनांच काय होणार ?
- ‘फडणवीसांना हिंदुंचा एवढाच कळवळा, तर मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही’?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

