नागपूर : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला तसाच निर्णय मुख्यमंत्री घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला, तसाच निर्णय मुख्यमंत्री लवकरात लवकर घेण्याची शक्यता आहे. ती चर्चाही झाली आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ जर राज्यात लॉकडाऊन लागले तर काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करून प्रवेश बंदी करण्यात येईल. तसेच रेल्वे, शाळा बंद करण्याचा निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. मात्र,निर्णय कधी घ्यायचा याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

