मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर २९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. याबाबतची माहिती स्वत: सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन दिली होती. तद्पश्चात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांनी काल संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, यावेळी समवेत सहकारी मित्र उपस्थित होते, असे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटवरून चर्चांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २९ तारखेला कोव्हीड पॉसिटीव्ह आल्या होत्या आणि आज आमदार निलेश लंके ह्यांनी ताईंची भेट घेतली. हे काय गौडबंगाल आहे? ताई थापा मारताहेत की हे सगळेच लोकप्रतिनिधी निष्काळजी आहेत?’, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २९ तारखेला @supriya_sule +ve आल्या होत्या आणि आज आमदार निलेश लंके ह्यांनी ताईंची भेट घेतली.
हे काय गौडबंगाल आहे? ताई थापा मारताहेत की हे सगळेच लोकप्रतिनिधी निष्काळजी आहेत? pic.twitter.com/za9IyviKaK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 3, 2022
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या भेटीसंदर्भातील ट्विटवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात आल्यानंतर निलेश लंके यांनी अजून एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये ते म्हणाले आहेत की,’मी २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुप्रियाताईंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. माझ्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरून या भेटीची माहिती उशीरा पोस्ट केल्या मुळे, कोणीही याबाबत संभ्रम निर्माण करू नये.’
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका


