मुंबई : सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांची आज जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी ट्विटच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले आहेत की,’संपूर्ण देशातील महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची क्रांती आणून स्वातंत्र्याची पहाट फुलवणाऱ्या मुक्तिदातीची आज जयंती.सावित्री बाई फुले यांनी जे काही कार्य केलं आहे,त्याच मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं,अशक्य आहे.
या महान प्रेरिकेस माझा मानाचा सलाम.’
संपूर्ण देशातील महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची क्रांती आणून स्वातंत्र्याची पहाट फुलवणाऱ्या मुक्तिदातीची आज जयंती.सावित्री बाई फुले यांनी जे काही कार्य केलं आहे,त्याच मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं,अशक्य आहे.
या महान प्रेरिकेस माझा मानाचा सलाम..! pic.twitter.com/0PBr8bLnts— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2022
दरम्यान, सावित्रीबाई फुले ह्या समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका


