Share

‘..तर कदाचित संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

Published On: 

मुंबई : मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. यावेळी ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

‘अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचे आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, कोरोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आता सुद्धा मी गर्दी बघितली, ही गर्दी योग्य नाहीये. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे. म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. मी सर्वांना विनंती करतो, कोणतेही राजकीय स्वार्थ अथवा आपल्या स्वतःचे स्वार्थ यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक ,सामाजिक संघटनाना मी विनंती करतो, आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असे काही करू नका’ या शब्दात मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!