Share

पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्य सरकारने स्थानिक पातळीवरील निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत हायकंमाडला भेटून आपली म्हणणे पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसने राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात स्वबळाचा नारा देत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे बीडमध्ये महाविकास आघाडीमध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्यात. परळी शहरात काँग्रेसने आगामी परळी नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा पत्रकार परिषदेतून केली आहे. परळी पालिका राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असून राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत एकत्रित असलेल्या दोन्ही पक्षांमधील स्थानिक कार्यकर्ते आमने-सामने येणार हे निश्चित आहे.

तर काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी शहराच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली. तसेच विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. परळी नगरपालिकेच्या कचरा डेपावरून त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. तसेच विविध कामांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पंकजा यांनी केला.

एकीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य मनात ठेवत पंकजा मुंडे यांनी परळी पालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही उघडपणे धनंजय मुंडेवर टीका करत एकला चलो ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे परळी नगर परिषदेवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!