🕒 1 min read
मुंबई : ‘देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल यांचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत, तर राहुल गांधी या पदासाठी निष्क्रिय आहेत असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली होती. दानवेंच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस नेते चांगलेच संतापले आहेत.
२०१९ साली काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर दानवे यांना त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ‘खरे म्हणजे जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, अशा शब्दात सत्तार यांनी दानवे यांना टोला लगावला आहे.
तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दानवेंचा समाचार घेतला आहे. ‘अशा प्रकारची वक्तव्य करून त्यातून लोकांचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे. पण रिकामे पोट मनोरंजन घडवू शकत नाही. आज बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे. या सगळ्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी आता भाजपचे प्रयत्न सुरु आहेत’ असे पटोले म्हणाले.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
राहुल गांधी देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे असून ते कोणत्याच कामाचे नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे केले. ‘एखाद्या देवाला आपण गोरे सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे?, असा प्रश्न दानवेंनी कार्यकर्त्यांना विचारला. त्यावेळी सांड असे उत्तर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात दिले. त्यावर दानवे पुढे म्हणाले की, ते काय करते त्याला म्होरकी नसते, त्याला वेसण नसते. कुठे बांधायचे झाले तर त्याला ठिकाणाही नसतो. याचे कारण म्हणजे त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जाते आणि खाते. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या, खाऊद्या त्याला, ते तरी कुठे जाईल खायला. आणि खाऊन मग हा कसा लठ्ठ्या होतो.’ अशी टीका दानवे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
- ‘हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेने सत्ता मिळवत राज्यात हिटलरशाही सुरू केली’
- तहसीलदार ज्योती देवरे सुसाईड ऑडिओ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
- भाजपकडून संभाजीराजेंचा गैरवापर, आंदोलनात मराठा समाज नव्हे भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग-अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
