Share

‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

जालना : राहुल गांधी देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे असून ते कोणत्याच कामाचे नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. डाॅ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी सकाळी बदनापूर येथे आली तेव्हा मंत्री दानवे बोलत होते. ‘देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल यांचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत, तर राहुल गांधी या पदासाठी निष्क्रिय आहेत, असे मंत्री दानवे या वेळी म्हणाले.

‘एखाद्या देवाला आपण गोरे सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे?, असा प्रश्न दानवेंनी कार्यकर्त्यांना विचारला. त्यावेळी सांड असे उत्तर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात दिले. त्यावर दानवे पुढे म्हणाले की, ते काय करते त्याला म्होरकी नसते, त्याला वेसण नसते. कुठे बांधायचे झाले तर त्याला ठिकाणाही नसतो. याचे कारण म्हणजे त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जाते आणि खाते. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या, खाऊद्या त्याला, ते तरी कुठे जाईल खायला. आणि खाऊन मग हा कसा लठ्ठ्या होतो.’ अशी टीका दानवे यांनी केली.

केंद्रीय रेल्वे मंत्री पद मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे मराठवाड्यात फिरत आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भागवत कराडांसोबत असलेल्या दानवे यांची जीभ वारंवार घसरतांना दिसून येत आहे. या आधीही सिल्लोड या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभात त्यांनी अब्दुल सत्तार सिल्लोडला जिल्हा करू शकतो का? असा एकेरी सवाल करत टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!