सांगली : सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी असतानाही बैलगाडी शर्यत भरवणे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर विनापरवाना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचा भंग करुन बैलगाडी शर्यत घेतल्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून चर्चेत असलेली आटपाटी तालुक्यातील झरे येथील बैलगाडा शर्यत अखेर शुक्रवारी पहाटे पार पडली. शर्यतीचे आयोजन होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यात संचारबंदी जाहीर केली होती. झरे गावासह आसपासच्या नऊ गावांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी आमदार पडळकरांसह आयोजनात सहभागी असलेल्या झरे गावातील ग्रामस्थांना नोटिसा पाठवल्या होत्या. यानंतरही शुक्रवारी पहाटे पोलिसांना चकवा देत बैलगाडी शर्यत पार पडली.
शर्यतीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार पडळकर यांनी जिल्हा प्रशासनाला धोबीपछाड दिल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली. त्यामुळे यावर पोलीस काय कारवाई करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शुक्रवारी संध्याकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमविणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्या अंतर्गतसुद्धा सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
- ‘हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेने सत्ता मिळवत राज्यात हिटलरशाही सुरू केली’
- तहसीलदार ज्योती देवरे सुसाईड ऑडिओ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

