Share

‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील अनेक प्रमुख विरोधी नेत्यांसोबत शुक्रवारी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. संसदेच्या आगामी अधिवेशनांतही विरोधकांची एकजूट कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तथापि, मोठी राजकीय लढाई संसदेबाहेर लढली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या.

‘विरोधकांचा संसदेत ऐक्यावर विश्वास आहे, पण एक मोठी राजकीय लढाई त्याबाहेर लढावी लागणार आहे. आपलं लक्ष्य २०२४ लोकसभा निवडणुका आहेत आणि त्यासाठी पद्धतशीर नियोजन करावे लागेल. हे एक आव्हान आहे, पण एकत्र आपण ते करू शकतो. कारण याच्यावर दुसरा पर्याय नाही’ असे आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केले.

बैठकीत काँग्रेससह १९ राजकीय पक्ष सहभागी झाले. आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी आणि बसपतर्फे कुणीही सहभागी झाले नाही. तर काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, द्रमुक. शिवसेना, जेएमएम, सीपीआय, सीपीएम, नेशनल कॉन्फ्रेंस, आरजेडी, एआययूडीएफ, वीसीके, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आएसपी, केरल काँग्रेस मणी, पीडीपी आणि आययूएमएल या पक्ष आणि संघटनांनी बैठकीत सहभाग घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!