मुंबई : बॉलीवूड अभिनेता ‘संदीप नाहर’ यानं त्याच्या मुंबईतील गोरेगाव येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये जीवन संपवले. संदीप नाहर याने दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम केलं होत . याशिवाय संदीपनं ‘केसरी’, ‘कहने को हमसफर हैं’ अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.

संदीपने मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, संदीपनं आपल्या पोस्ट मध्ये कौटुंबिक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचं म्हंटल आहे. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचं देखील संदीपनं म्हटलं आहे.
‘संदीप नाहर’च्या अश्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला असून, चित्रपटसृष्टीत देखील चर्चेला उधाण आलं आहे. संदीपने खरच आपले जीवन संपवले आहे का ? याचा तपास आता पोलीस अधिकारी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ॲक्शन सीन दरम्यान जॉनला दुखापत, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती
- ‘काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात’
- ‘भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे ?’
- “खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी…”,अक्षर पटेलचं चोख प्रतिउत्तर
- परभणीत पेट्रोलच्या दराने गाठली शंभरी, पॉवर पेट्रोल १०० रुपये ३७ पैसे प्रतिलिटर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
