Share

“खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी…”,अक्षर पटेलचं चोख प्रतिउत्तर

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे चेन्नईच्या पिचनं पहिल्या दिवसापासून स्पिनर्सला मदत केली आहे. दुसऱ्या दिवशी तर या पिचवर भारताच्या पाच आणि इंग्लंडच्या 10 अशा एकूण 15 विकेट्स गेल्या. चेन्नईच्या पिचवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला.  भारतीय खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठीच फायदेशीर असते, अशी टीका करणाऱ्यांना फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खेळपट्टीवर टीका करण्याआधी आपल्या मानसिकतेत बदल करावा असा सल्ला देखील दिला आहे.

इंग्लंड संघाचा पूर्व कर्णधार माईकल वॉन याने खेळपट्टीबद्दल भाष्य करताना, चेपॉक मैदानातील खेळपट्टी पूर्णपणे तयार नसल्याचे म्हटले होते. यावर अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘जर तुम्ही खेळपट्टीबद्दल बोलत असाल तर मला नाही वाटत की कुठलाही चेंडू हेल्मेटला जाऊन धडकला आहे. चेंडू सामान्यरित्याच फिरत होता. आम्ही (दोन्ही संघ) एकाच खेळपट्टीवर खेळत आहोत आणि धावा सुद्धा करत आहोत. यामुळे मला नाही वाटत की कोणालाही या गोष्टीचा त्रास असेल.’

तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर अक्षर पटेल म्हणाला, ‘जेव्हा आम्ही परदेशात खेळण्यासाठी जातो, तेव्हा आम्ही जलद गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीबद्दल कधीच तक्रार नाही केली की खेळपट्टीवर गवताचे प्रमाण अधिक आहे. मला तर वाटते लोकांना खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे, अशात तुम्हाला जास्त काही करायची आवश्यकता नाही आहे. जेव्हा तुम्ही चेंडू फेकणार तेव्हा थोडा जोर लावून फेकला तेव्हा चेंडू फिरेल.’

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!