Share

ॲक्शन सीन दरम्यान जॉनला दुखापत, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम ‘अटॅक’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. पण तिथल्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला आहे. अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाली आहे. ज्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले. शूटिंग दरम्यान जॉनला दुखापत हि पहिली वेळ नाही या आधी देखील जॉनला फायटिंग सीन करताना दुखापत झाली आहे.

जॉन अब्राहमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. फोटोमध्ये जॉन अब्राहम शूटिंग दरम्यान ट्यूबलाइटचा अ‍ॅक्शन सीन करत होता आणि त्यावेळीच तो जखमी झाला आहे.

व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या टीममधील एक सदस्य जॉनच्या गळ्याच्या तिथून येणारे रक्त पुसताना दिसत आहे. जॉन अब्राहमने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘ज्या मार्गाने हे सुरू झाले आणि पुढे जात आहे चांगले वाटत आहे. या व्हिडीओमध्ये, मेकअप आर्टिस्ट सांगताना दिसत आहे की, हा लाल रंग नसून प्रत्यक्षात रक्त आहे. लक्ष्यराज आनंद दिग्दर्शित ‘अ‍टॅक’ मध्ये रकुलप्रीत सिंग जॉन अब्राहमसोबत दिसणार आहेत.

‘जॉन अब्राहम’ नेहमीच अश्या सिनेमांमध्ये अभिनय करताना दिसत असतो. नेहमीच अश्या वेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. नेहमीच वेगळा लुक आणि बॉडी मुळे जॉन नेहमी चर्चेत असतो. यावेळीही जॉन आपल्याला अश्याच एका नवीन लुक मध्ये दिसणार आहे. जॉनने आपल्या ‘सत्यमेव जयते २’ या सिनेमातील नवीन लुक आपल्या ट्विटर द्वारा शेअर केला आहे. नेटकऱ्यांमध्ये या सिनेमाची व जॉन अब्राहमच्या नवीन लुकची जोरदार चर्चा चालू आहे.

https://www.instagram.com/p/CLTLd0SFE-Y/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CK8yOetlKtN/?utm_source=ig_web_copy_link

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!