मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
बंगालमध्ये ममता यांच्या तृणमूलला गळती लागली असून, अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत. पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी,आमदार अरिंदम भट्टाचार्य,सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान तृणमूल खासदार महुआ मोइत्रा या मात्र ममतांच्या बाजूने खिंड लढवणाऱ्या ठरत आहेत. याच मोइत्रा यांनी संसदेत ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न विचारला आहे. यावरून शिवसेनेने देखील भाजप वर निशाणा साधला आहे.
‘तृणमूल काँग्रेसच्या झुंजार खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न श्रीमती महुआ यांनी विचारला आहे. महुआ या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्या प. बंगालातून प्रथमच निवडून आल्या, पण एखाद्या अनुभवी खासदारास मागे टाकतील अशी संसदीय झुंज त्या लोकसभेत देत आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना ‘बंगालची वाघीण’ असे म्हटले जाते. संपूर्ण केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्यासाठी प. बंगालात उतरले आहे.
केंद्र सरकार म्हणजे अफवा, चुकीची माहिती पसरविणारा फुटीर उद्योग झाला आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला करताना सांगितले, ”काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात.” यावर भाजप जाम भडकला आहे. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राममंदिरासंदर्भात निकाल दिल्याचा आरोप महुआ यांनी केला. महुआ यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जोरदार भाषण झाले व अर्थव्यवस्थेपासून कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्दय़ांवर त्यांनी सरकारची बोलती बंद केली, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल लिलावाआधीच ‘या’ टीमनं बदललं नाव!
- रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ठोकल्या बेड्या
- “त्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, शेतकरी आंदोलनावर हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य”
- नांदेडच्या गुरपिंदसिंगची पुराव्याआभावी मुक्तता
- तामिळनाडू, राजस्थानच्या धर्तीवर मराठा समाजाला वेगळा न्याय ही भूमिका पटली नाही : अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
