परभणी : जगात जर्मनी भारतात परभणी अशी एक परभणीकरांची म्हण आहे. पेट्रोल दरवाढीच्या निमत्ताने त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. परभणीत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. सोमवारी परभणीत पॉवर पेट्रोलचे दर १०० रुपये ३७ पैसे प्रतिलिटर होते. तर साध्या पेट्रोलचे दर ९७ रुपये ५९ पैसे आणि डिझेलचे दर ८७ रुपये ९ पैसे प्रतिलिटर होते. गेल्या महिनाभरापासू परभणीतील पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत आहे.
१ फेब्रुवारी रोजी पेट्रोलचे दर ९५ रुपये २२ पैसे, तर डिझेलचे दर ८४ रुपये ३२ पैसे होते. त्यानंतर त्यात वाढ झाली आणि ४ फेब्रुवारीला पेट्रोल ९५ रुपये ३५ पैशांवर पोहोचले, तर डिझेलचेही भाव ८४ रुपये ४८ पैसे झाले. त्यानंतर ६ ते ८ फ्रेब्रुवारी पर्यंत हे दर स्थिर होते.
दरम्यान, पुन्हा ९ फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरामध्ये ९५ रुपये ९७ पैशांपर्यंत वाढ झाली, तर डिझेल ८५ रुपये १५ पैशांवर पोहोचले, १५ फ्रेब्रुवारीला रोजी पॉवर पेट्रोलचे दर १०० रुपये ३७ पैसे एवढे होते. त्यामुळे इंधन दर जर असेच वाढत राहिले तर येत्या काही दिवसत सध्या पेट्रोलचे दरही ९७ रुपये ५९ रुपयांवरून 100 रुपयांवर पोहोचायला वेळ लागणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू, राजस्थानच्या धर्तीवर मराठा समाजाला वेगळा न्याय ही भूमिका पटली नाही : अशोक चव्हाण
- जालना जिल्ह्यासाठी २६० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी; ७९ कोटींचा वाढीव निधी
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये ‘जननायक’म्हणून गौरव
- रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ठोकल्या बेड्या
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
