मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती आता आणखी चिंताजनक बनत चालली आहे. राज्याच्या गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात दोन शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामाच्या शिफ्टमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता मंत्रालयात दोन शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, या प्रकारात काम करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एकदिवस आड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात कोविड काळात संसर्ग टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून आता हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागाच्या सचिवांनी कर्मचारी विभागणी करावी, असे आदेश देण्यात आले आहे.
मंत्रालयामधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी मुख्य सचिव यांनी सर्व सचिवांना सूचना केल्या होत्या. यात आठवडा, प्रत्येकी 1 दिवसआड अथवा 3 दिवस अदलाबदली कर्मचारी काम करण्याबाबत नियोजन करावे,अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
मंत्रालयातील प्रत्येक विभागात सामाजिक सुरक्षा अंतर, कर्मचारी गर्दी होणार नाही, सॅनिटाझयर वापर याकडे लक्ष सचिवांनी द्यावे, असे आदेश मुख्य सचिव यांनी दिले होते. त्यानुसार, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, अखेरीस एकदिवस आड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत बुरख्यावर बंदी,एक हजाराहून अधिक मदरसेही होणार बंद
- इशानच्या उत्तम कामगिरीमुळे सिनिअर खेळाडूची जागा धोक्यात?
- भाचा कृष्णा अभिषेकच्या वादावर गोविंदाचे मोठे भाष्य
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- बँकांच्या खासगीकरणावर आरबीआयच्या माजी गव्हर्नर राजन यांनी केली चिंता व्यक्त


