Share

भाचा कृष्णा अभिषेकच्या वादावर गोविंदाचे मोठे भाष्य

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता गोविंदाने त्याचा भाचा कृष्णा अभिषेक सोबत असलेल्या वादावर आपले मौन सोडले आहे. यावेळी बोलताना गोविंदा म्हणाला की, कृष्णा चांगला मुलगा आहे. पण त्याला भडकवतंय माहित नाही. कृष्णा अभिषेत अनेक कॉमेडी शोमध्ये गोविंदाची थट्टा करताना दिसला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा पाहुणा म्हणून आला होता पण, कृष्णा या एपिसोडमधून गायब दिसला होता. या निमित्ताने गोविंदा व कृष्णा यांच्या कौटुंबिक वादाची चर्चा रंगली होती.

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक या मामा-भाच्यातील धूसफुस थांबण्याची चिन्हे नाहीत. एका मुलाखतीत गोविंदाला प्रश्न विचारण्यात आला की, ‘कृष्णा अनेक कॉमेडी शोमध्ये तुझी थट्टा करताना दिसतो, याबद्दल तू काय म्हणशील?’ यावर बोलताना गोविंदाने. ‘ तसा कृष्णा खूप चांगला मुलगा आहे. तो असे का करतो, का वागतो, त्याच्याकडून हे कोण करवून घेतेय, मला माहित नाही. तो माझी थट्टाच करुन माझी पब्लिक इमेजही खराब करतो आहे. असे गोविंदा म्हणाला.

कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने केलेल्या एका टि्वटमुळे कृष्णा व गोविंदा यांच्यात वाद सुरु झाला होता. या टि्वटमध्ये लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मीराने हे टि्वट नणंद बहीण आरती सिंगसाठी टाकले होते असे स्पष्टीकरण कृष्णाने दिले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!