अहमदाबाद : कॅप्टन विराट कोहली आणि पहिलीच मॅच खेळणारा इशान किशन यांच्या अर्धशतकामुळे भारतानं टी20 मालिकेत जोरदार पुनरागमन केलं आहे. भारताने दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचा 7 विकेटने पराभव करत पाच मॅचच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ७ गडी राखुन पराभव केला. या सामन्यातील सामनावीर इशान किशनचे सगळीकडे कौतुक होत आहे. किशनच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवीण्यात आले.
भारतीय टीमनं या मॅचमध्ये प्रयोग करत शिखर धवनच्या जागी इशानला संधी दिली. शिखरला पहिल्या मॅचमध्ये खास कामगिरी करता आली नव्हती. तो 12 बॉलमध्ये फक्त 4 रन काढून आऊट झाला. विराटने या मालिकेच्या पूर्वी रोहित शर्मा आणि केएल राहुल हे पहिल्या पसंतीचे सलामीवीर आहेत, असं सांगितले होतं. रोहितला विश्रांती दिल्यानेच धवनला पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली. मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरल्यानं त्याला टीमममधून वगळण्यात आलं.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशन सध्या फक्त 22 वर्षांचा आहे. भारतीय टीममध्ये तो शिखरच्या ऐवजी सलामीचा दावेदार बनू शकतो. इशान देखील धवन प्रमाणे डाव्या हाताने बॅटींग करतो. मोठे फटके लगावण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याने मागच्या आयपीएल सिझनमध्ये 14 मॅचमध्ये 516 रन केले होते. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश होता. इशानच्या या साऱ्या विशेष गोष्टींचा थेट परिणाम हा शिखर धवनवर होणार आहे. त्यामुळे त्याची भारतीय टीममधील आधीच डळमळीत असलेली जागा आता धोक्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची या संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

