कोलंबो- मुस्लीम महिलांच्या बुरखा या वेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश श्रीलंकेत देण्यात आले आहेत. तसंच एक हजाराहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार आहेत, श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सरथ वेरासेकेरा यांनी या निर्णयाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
मुस्लीम महिलांचं परिधान असलेला बुरखा किंवा तत्सम अन्य कोणत्याही चेहरा संपूर्ण झाकणाऱ्या पोशाखांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी मुस्लीम महिला आणि मुली बुरखा वापरत नव्हत्या, हे धार्मिक दहशतवादाचे लक्षण असून ही पद्धत अलीकडेच आली आहे, त्यामुळे आम्ही बुरख्यावर बंदी घालणारच आहोत, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं वेरासेकेरा यांचं म्हणणं आहे
एप्रिल 2019 साली ईस्टर संडेच्या दिवशी चर्च आणि हॉटेलांमध्ये सुनियोजित पद्धतीने स्फोट घडवण्यात आले होते. मानवी बॉम्बनं कॅथलिक चर्च, पर्यटकांचे हॉटेल यांना निशाणा केला होता. या स्फोटात 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
इस्लामिक स्टेट या कट्टरतावादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतली होती.यानंतर श्रीलंकेत कट्टरतावाद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली होती, तेव्हाही तातडीचा उपाय म्हणून काही कालावधीसाठी चेहरा झाकणाऱ्या गोष्टींवर बंदी आणण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
- पदार्पणातच अर्धशतक झळकावत इशान किशनने जिंकले मन


