बीड : एकीकडे शहरांचे नामांतर करण्याचाा मुद्दा राज्यभरात गाजत आहे. वास्तुंची नावे देखील बदलण्याचा घाट काही ठिकाणी घातला जात आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक नवीन मागणी समोर आली आहे. माजलगाव धरणाचे लोकनेते कै.सुंदररावजी सोळंके जलाशय नामांतर करावे अशी मागणी होत आहे.
माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या दूरदृष्टीतून माजलगाव धरण प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्प उभारणीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण पुढील अनेक पिढ्यांना राहावे, यासाठी या धरणाचे नामकरण ‘लोकनेते कै.सुंदररावजी सोळंके जलाशय’ असे करण्यात यावे, अशी मागणी सन्मित्र मित्रमंडळाच्या वतीने आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे केली आली.
लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या भगीरथ प्रयत्नांतून माजलगाव धरण प्रकल्प उभा राहिला. त्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले आहे. तालुका सुजलाम सुफलाम करण्यात माजलगाव धरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नामकरणासह धरण परिसराचे सुशोभीकरण करून स्मृती स्मारक आणि उद्यानाची निर्मिती करण्यात यावी. यामुळे शहराच्या वैभवातही भर पडेल व पर्यटनस्थळ म्हणून धरण परिसराचा विकास होईल, अशीही मागणी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची या संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
