औरंंगाबाद : दरवाजासमोर तोंड धुतल्याच्या कारणावरुन एका महिलेने तक्रारदार महिलेला मारहाण करुन डोके फोडले. ही घटना २१ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गारखेडा परिसरातील इंदिरानगर भागात घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर भावानी बहिणीला रॉडने मारल्याची दुसरी घटना रामनगर भागात घडली. मागील भांडणाच्या कारणावरुन मंगेश जाधव (रा. विठ्ठलनगर, रामनगर, मुकुंदवाडी) याने बहिणीला रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रामनगरात घडली. तक्रारदार बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास पोलीस करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सांगली, कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट ; मदतकार्यासाठी जाणार’ ; खासदार संभाजीराजे
- मिलरच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची आर्यलँडवर ४२ धावांनी मात
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- बचावकार्याचा वेग वाढवून राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी – आठवले
- दुसऱ्या टी-२० सामन्यात झिंबाब्वेचा बांग्लादेशवर धक्कादायक २३ धावांनी विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

