Share

दुसऱ्या टी-२० सामन्यात झिंबाब्वेचा बांग्लादेशवर धक्कादायक २३ धावांनी विजय

Published On: 

मुंबई : बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिंबाब्वेने बांग्लादेशचा ३३ धावांनी पराभव केला आहे. झिंबाब्वेने दिलेल्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संपुर्ण संघ १४३ धावांवर बाद झाला. यासह झिंबाब्वेने तीन टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

झिंबाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात ६ गडी गमावत १६६ धावांची मजल मारली. सलामीवीर वेस्ले माधेवरेने झिंबाब्वेकडून ५७ चेंडुत ५ चौकार आणि ३ षटकारासंह सर्वाधीक ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. बांग्लादेशकडून या डावात शोरीफुल इस्लामने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ केवळ १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. यासह झिंबाब्वेने हा सामना २३ धावांनी जिंकला. बांग्लादेशकडून शमीम हुसैनने १३ चेंडुत ३ चौकार आणि २ षटकारासंह २९ धावांची सर्वाधीक खेळी केली. तर झिंबाब्वेकडून वेलिंग्टन मसाकाझा आणि ल्युक जॉन्गवे या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या वेस्ले माधेवरेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!