कोल्हापूर : कोकणसह कोल्हापूर , सांगलीलाही पुराने विळखा घातला आहे. पंचगंगा तसेच कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सांगली शहरातून कोल्हापूरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली आला आहे.
त्यामुळे इथली वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलीय. काही रस्ते पाण्याखाली आल्याने पर्यायी मार्गाचा विचार केला जातोय. पण कालपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, मदतकार्यासाठी आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितले.
कोल्हापूर हायवेर 20 किलोमीटरची भलीमोठी रांग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 50 फुटांवर पोहोचली असून सांगलीतल्या नदीकाठी असणाऱ्या काही भागात नदीचे पाणी शिरले आहे. सांगलीतल्या बाजारपेठांमधला काही भाग सध्या पाण्याखाली आहे.
दरम्यान रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्री रावसाहेब दानवे कुटुंबीयांशी संवाद
- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता मोबाईल वापराचीही आचारसंहिता
- ‘विकासाचे धोरण नसल्याने संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात’
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- ‘हा झटपट दौरा दु:ख पुसायला आहे की कडे निखळलेला डोंगर पाहायला?’


