अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद शहरात विवाहितेच्या आत्महत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयशा नावाच्या एका युवतीने अहमदाबादमधील साबरमती नदीच्या काठावर हा व्हिडिओ बनविला आहे. कुटुंबाला निरोप दिल्यानंतर तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार,आयशाचे लग्न आरिफ नावाच्या युवकाशी झाले होते, पण लग्नानंतर लगेचच त्याने आयशाच्या कुटूंबाकडून हुंड्याची मागणी करण्यास सुरवात केली. सुमारे दीड लाख रुपयांची व्यवस्था करुन आयशाच्या वडिलांनी त्याला पैसे दिेले, परंतु काही काळानंतर त्याने पुन्हा मागणी करण्यास सुरवात केली.
आयशाच्या कुटुंबीयांनीही याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते पण आयशाच्या बोलण्यातून असे दिसते की तिचा पती असलेल्या आरिफवर तिचे प्रेम आहे आणि ती केस मागे घेण्यास सांगत आहे.
आयशाचे वडील लियाकत अली यांनी सांगितले की, मुलीचे लग्न २०१८ मध्ये जालोर (राजस्थान) येथे राहणाऱ्या आरिफ खानसोबत झाले होते. पण लग्नानंतरच तिच्यावर हुंड्यासाठी छळ करण्यात आला.वडिलांनी सांगितले की, आरिफचे कुटुंबीय दीड लाखांची मागणी करीत होते त्यांनी काही पैशांची व्यवस्था केली देखील मात्र त्याचा लोभ वाढत गेला.
यांनतर आरिफने आयशाला अहमदाबादला सोडले. काही दिवसांपूर्वी आयशाने आरिफला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती पण आरिफने उत्तर दिले की जर तुला मरायचे असेल तर जा आणि मर. यामुळे आयशाने हे पाऊल उचलले.
नेमके काय म्हणाली आयशा ?
हेलो सलाम वालैकुम, मेरा नाम आयशा…आयशा आरिफ खान, मी जे काही करत आहे यावर कुठलाही दबाव नाही. मला माझ्या इच्छेनुसार करायचे आहे असे म्हणा की देवाने मला एवढेच जीवन दिले.
… आणि प्रिय बाबा, तुम्ही किती काळ लढा द्याल, खटला संपवा, संघर्ष करण्याचा हेतू नाही, आरिफला स्वातंत्र्य हवे आहे, ठीक आहे, त्याने मोकळे व्हावे. आपले जीवन एवढंच होते. माझं आयुष्य सुखी झालं, मला आरिफ आवडतो. मी आनंदी आहे की मला अल्लाहला भेटायला मिळेल…हे प्रिय नदी, मी प्रार्थना करते की तू मला तुझ्यात सामावून घे.
महत्त्वाच्या बातम्या
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- आरोग्य विभागात गुणवत्तेलाच प्राधान्य ; आरोग्यमंत्र्यांनी दिला परीक्षार्थींनी धीर
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

