Share

हिवाळी ऑलिम्पिकला चीनची राजधानी बीजिंग मध्ये दिमाखदार सुरुवात

Published On: 

बीजिंग: २०२० मध्ये मार्च महिन्यात जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण जग जवळपास ठप्प झाले होते. क्रीडा क्षेत्राला पण कोरोनामुळे जबरदस्त धक्का बसला होता. आता हळू हळू कोरोना विषाणूचा प्रभाव कमी व्हायला लागल्यावर जगभरातील क्रीडा क्षेत्र पूर्वपदावर यायला लागले आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात जपान या देशाची राजधानी असणाऱ्या टोकियो या शहरात यशस्वी पणे ऑलिम्पिकचे आयोजन झाले. त्यानंतर काहीच दिवसात टोकयो शहरातच दिव्यांग खेळाडूंच्या ऑलीम्पिकचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

आता आजपासून चीनची राजधानी असणाऱ्या बीजिंग शहरात हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.  या निमित्ताने बीजिंग हा दोन्ही ऑलिम्पिकचे आयोजन करणारा पहिलाच देश ठरला आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सोहळय़ात लेझर-किरणांचा देखावा सादर करण्यात आला. भारताने या स्पर्धेच्या प्रक्षेपणावर बहिष्कार टाकला असून आरिफ खान हा एकमेव भारतीय स्पर्धक या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे.

        महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!