Share

१९ वर्षांखालील विश्वचषकात भारताची दमदार सुरुवात

Published On: 

वेस्टइंडीज : भारताने ऑस्ट्रेलिया संघाला चारी मुंड्या चीत करत दिमाखात सलग चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फेरीत प्रवेश केला आहे. भारताची १९  वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची सुरुवात पण दिमाखात झाली आहे. दरम्यान इंग्लंडच्या  १९ वर्षाखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करायचा निर्णय घेतला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात अयशस्वी पण झाला आहे. भारताचा १९ वर्षाखालील संघातील जलदगती गोलंदाज रवी कुमार याने पहिल्याच षटकात २  बळी घ्यायची किमया केली आहे. त्याने जेकब बेथेल आणि इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्ट यांना पहिल्या काहीच चेंडूंमध्ये पायचीत आणि त्रिफळाचित केले आहे. तर राज बावा याने पण इंग्लंडचे ४ बळी घेतले आहे.

१९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारे दोन्ही संघ हे आत्ता पर्यंत अपराजित राहिले आहेत. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर इंग्लंडने अफगाणिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. भारताने सलग चार वेळा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तर १९ वर्षांखालील इंग्लंड संघाने सुद्धा तब्बल २४ वर्षांनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने दोघांच्यात रोमहर्षक सामना बघावयास मिळणार आहे एवढं नक्की. भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार यश धूल हा दिल्लीचा आहे , पूर्वी दिल्लीच्याच विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००८ आणि २०१२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.

         महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!