Share

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमागे फरफटत… नाना पटोले

Published On: 

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्ष या निवडणुकीत प्रचाराला उतरले आहेत. मात्र, राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेले शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निवडणुकीत मात्र एकत्र येणार नसल्याचेच संकेत आता मिळत आहेत.

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमागे फरफटत जाणार नाही असे विधान कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होणार का ? असा प्रश्न तीनही पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला पाडला आहे.

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, तीनही पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.  त्यामुळं आम्ही आता कोणाच्या पाठीमागे फरफटत जाणार नाही. कोण मजबूत आहे आणि कोण कमजोर आहे हे राज्यातील जनता ठरवेल. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहरे काँग्रेस विचारधारेची आहेत. काँग्रेस त्याच ताकदीने जनतेसमोर जाणार आहे. पुणे, पिंपरी महानगर पालिका भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाने लाच घेणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. या दोन्ही महानगर पालिका काँग्रेसच जिंकेल. कोणी प्रस्ताव दिल्यास त्यावर आम्ही विचार आणि चर्चा करू असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!