Share

“आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकतेय…”; चित्रा वाघ यांचा टोला

Published On: 

मुंबई: काल (४ फेब्रु.) भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकेचा वर्षाव केला. त्यानंतर अमृता यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.

याच मुद्द्यावर आज मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते,’कॉमेडीला टीव्हीवर राहू देत, आपण राजकीय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं. शिवसैनिकांना कुठल्या बास्केटमध्ये कुठला बॉल टाकायचा हे माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. निवडणूक सुरु होतील तेव्हा आपण त्यावर बोलू. चांगली काम होत असतात ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना प्रचारात उत्तर देऊ.’

आता या वादात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ सुद्धा उतरल्या आहेत. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना त्यांची ‘दिशा’ चुकत असल्याचं म्हटलंय. आदित्यजी, तुमची ‘दिशा’ चुकतीये अमृता फडणवीसजींवर टिका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विनप्रेमामुळे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशाचा हिशोब द्या. राठोड राऊत परब सारख्या पात्रामुळे शिवसेना ‘हास्य जत्रा’ बनलीये कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही.. ‘चला.. हवा येऊ द्या..’
महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!