जालना: सध्या राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा, आता त्यात इतर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. मुस्लिम समाजाने १० टक्के आरक्षणाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. देशातली परिस्थिति पाहता मुस्लिम समाजाला आरक्षण तसेच अॅक्ट्रासिटी सारखा कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी एक निवेदनाद्वारे सकल मुस्लिम समाजाने केली आहे. सकल मुस्लिम समाजातर्फे शुक्रवारी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हे निवेदन पाठवण्यात आले.
महाराष्ट्रासह देशातील मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, अर्थिक मागास अवस्था पहाता मुस्लिम समाजास शासकीय, निमशासकीय नौकरींमध्ये १०टक्के आरक्षण द्यावे तसेच देशभरात मुस्लिम समाजा सोबत होत असलेली मॉबलिंचिंग पहाता त्यांच्या संरक्षणासाठी अॅक्ट्रासिटी सारखा कायदा करण्यात यावा, बार्टी, सारथी, महाज्योतिच्या धर्तिवर मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या व इतर शैक्षणिक परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले, मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण व संरक्षण ही मागणी जुनिच आहे. मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठि केंद्र शासनातर्फे न्यायमुर्ती रंगनाथ मिश्रा अयोग, सच्चर समिति गठित करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे महेमुदर्ऊरहेमान समिती स्थापन करण्यात आली होती. या सर्व समिती व अयोगांनी अभ्यासाअंती पुराव्यासह अहवालात मुस्लिम समाजाची दयनिय व मागास अवस्था अधोरेखित करुन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट शिफारस करुनही अद्याप आरक्षण देण्यात आलेले नाही, अशी मागणी नगरसेवक शेख रहीम, शेख अय्युब अमिनोद्दिन व आदींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांचा मुद्दा येत्या अधिवेशनात सरकारची डोकेदुखी ठरणार ?
- शेखर सुमनच्या आईचे निधन, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती
- ‘ढग साफ झाले आहेत’ ; फोटो शेअर करत मुंबई इंडियन्सने क्रिकेट प्रेमींना दिला दिलासा
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- कोरोनामुळे देशाला दाेन लाख कोटींचा फटका; RBI चा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

