Share

‘पाऊसामुळे भारतीय संघ वाचला’ ; माजी कर्णधाराची टीका

Published On: 

इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे एकाही दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. क्रिकेटरसिकांसाठी असलेल्या या खास पर्वणीवर मात्र काल पावसाने पहिल्या दिवशी पाणी फेरले. यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी त्यावर टिपण्याही केल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला झाल्यानंतर सतत भारतीय संघावर निशाणा साधणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विट करत भारतीय संघावर पुन्हा एकदा टीका केली आहे. वॉनने ट्विट करत लिहिले, ‘मला वाटते की, वातावरणाने भारतीय संघाला वाचवले.’ यासह त्याने हसण्याचा इमोजी देखील वापरले आहे. गेल्या काही महिन्यापासून मायकेल वॉनहा अनेकदा भारतीय संघावर विविध प्रकारे टिका करताना आढळला आहे.

दरम्यान, रद्द झालेला हा सामना आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता  (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. पण, अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आजचा सामना होणार की नाही याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!