Share

लंका दहन करायला निघालेल्या गब्बरचा शर्टलेस फोटो पाहून रोहित शर्मा म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार १४ जुनपासुन श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल होत आहे. श्रीलंका दौऱ्यातील भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने मुंबईत पोहचल्यानंतर इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोत धवननं शर्टलेस दिसत आहे. त्याचा फोटो पाहून सलामी पार्टनर रोहित शर्मा प्रभावित झाला आहे. या फोटोला धवननं ‘माझा घाम हिऱ्यापेक्षा जास्त चमकतो’, असं कॅप्शन दिलं आहे. धवनच्या यो फोटोनं क्रिकेटपटूंसह अभिन्यांनाही प्रभावित केले आहे. रोहित शर्मानं सर्वात प्रथम ‘ओ की गल’ म्हणजेच क्या बात है! अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनानं आगीचा इमोजी पोस्ट केला आहे.

विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर ३० जुन रोजी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होईल. तिथे त्यांना काही दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर सराव करण्यास परवानगी मिळेल. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहे. भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यात युवा आणि खराब कामगीरीमुळे संघातील स्थान गमावलेले खेळाडू या दौऱ्यावर जातील. या दौऱ्यातील काही खेळाडूंना आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!