मुंबई: मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राजेश्वरी डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/reel/CQKgmErJj8v/?utm_medium=copy_link
या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी पंजाबी आणि हिंदी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये ती गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे. तिने मारलेले ठुमके पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत. ती ‘आँखोमे बसे हो तूम’ या बॉलिवूड गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. हावभाव कसे असावेत, ठेका कसा धरावा हे समजत नसल्यामुळे ती सुरुवातीला थोडी गोंधळलीसुद्धा. मात्र नंतर पुन्हा एकदा राजेश्वरी मजेदार डान्स करताना दिसतेय.
दरम्यान राजेश्वरी सध्या इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असून रोज नव नवीन व्हिडिओ शेअर करत आहे. राजेश्वरीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. राजेश्वरीची अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत. तिच्या व्हिडीओ वरती सध्या लाईक्सचा पाऊस पडत आहे. इंस्टाग्रामवरती राजेश्वरीचे फॉलोवर्स देखील बरेच आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


