Share

आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शेट्टींचा एल्गार कायम

Published On: 

मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबाच्या संसाराचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषानुसार मदत मिळावी या मागणीसह पुरासंबंधित अन्य काही मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा करत राज्य सरकारविरोधात जल समाधी आंदोलन पुकारले होते.

या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मुंबईत भेटायला बोलावले होते. आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेट्टींनी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेवर माहिती देतानाच आंदोलनाची भूमिका कायम असल्याचं देखील नमूद केलं आहे.

सरकारनं दफ्तर दिरंगाईचे प्रकार टाळले पाहिजेत. लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्याचबरोबर आंदोलन मागे घेणार असा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिला नाही. आंदोलनाचं शस्त्र खाली ठेवलेलं नाही. पण चर्चेचा मार्गही आम्ही खुला ठेवला आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

तर, कायम पुराचा धोका उद्भवणाऱ्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबतच्या कार्यवाहीबाबत देखील शेट्टींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘चिखली, आंबेगावच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर लोक सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण, 32 वर्षापूर्वी पुनर्वसनाच्या नावाखाली मिळालेली जागा अद्याप त्यांच्या नावावर झालेली नाही. म्हणून लोक आपली जागा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने कार्यवाही करायला हवी. पुनर्वसनाचे वाईट अनुभव आहेत. त्यामुळे सरकारने आयएस दर्जाचा अधिकारी नेमून प्रश्न निकाली लावावेतमी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!