Share

करुणा शर्मा यांना दिलासा! अवैध पिस्तूल प्रकरणी ‘या’ व्यक्तीवर गुन्हा दाखल

Published On: 

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करत, परळी शहरामध्ये आलेल्या करुणा शर्मा यांना काही महिलांनी रविवारी घेराव घातला. यातच, शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. ‘पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे पिस्तुल गाडीत टाकले आहे,’ असा आरोप शर्मा यांनी केला. तसेच त्यांच्यावरच एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

करुणा शर्मा या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलांशी बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी करुणा शर्मा यांच्याविरोधात एट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. करुणा यांना पोलिसा ठाण्यात नेत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली. तेव्हा कारच्या मागच्या बाजूला पोलिसांना एक गावठी पिस्तुल देखील आढळून आले.

मात्र, या प्रकरणी पोलिसांनी शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त केले आहे. या पिस्तूल प्रकरणी यावरून वाहन चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी) याच्याविरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला अटक केली असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी दिली. वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने करुणा शर्मा यांना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. कारण, प्रत्यक्षात ती बंदूक करुणा यांची नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

करुणा शर्मांच्या गाडीत बंदूक ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल
पोलिसांनी करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. करुणा यांच्या कारच्या डिक्कीत वस्तू ठेवणारी व्यक्ती वेशभूषेवरुन महिला वाटत असली तरी एकूण हालचाली पहाता महिलेचा वेष घेऊन आलेला तो पुरुष आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वस्तू ठेवणारा तो की ती याचेही उत्तर आता पोलिसांना शोधावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!