मुंबई : जबरदस्त अक्शन, डान्ससाठी प्रसिध्द असलेला अभिनेता ह्रतिक रोशन खूप चर्चेत आहे. नुकतेच सोशल मीडियावर वर्क आऊट दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यात हृतिकची जबरदस्त बॉडी पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे ह्रतिक रोशनची ‘फायटर’ ही भारतातली पहिली एरिअल अक्शन फिल्म आहे. विशेष म्हणजे यात हृतिकचे बायसेप्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत. त्याने स्टोरीवर काही फोटो पोस्ट केले आहे. यात त्याने रेडी फॉर अक्शन आणि ‘पुढे या आणि मला पंच मारा’, असे कॅप्शन दिले आहे. हृतिकचे हे फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद लवकरच’फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.
हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार असून भारतातली ही पहिली एरिअल अक्शन फिल्म असणार आहे. या चित्रपटासाठी जगभरातील ठराविक लोकेशन्स सीलेक्ट करून शॉट्स घेतले जाणार असल्याचं बोललं जातंय. हा चित्रपट अभिनेता हृतिकच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ट्विट नको जीआर हवा’ ; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राजू शेट्टी मुंबईत दाखल
- संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले
- वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी


