Share

सावधान! कोरोनाची नवी लक्षणं अढळली; सरकारला सतर्कतेचे आवाहन

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाचं सावट अद्यापही संपले नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये देशाला प्रत्येक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. दररोज नविन कोरोना रुग्णांची नोंदही होत आहे. शिवाय कोरोनाचे नवनविन प्रकार समोर येत असल्याने कोरोना धोका वाढतच आहे. त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. राहुल पंडित यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती दिली आहे. ‘ऐकू येण्यात अडचणी, अतिशय जास्त अशक्तपणा, तोंड सुकणं, तोंडात लाळ कमी तयार होणं, बराच वेळ राहणारी डोकेदुखी, त्वचेवर चकत्या तयार होणं, डोळे येणं ही करोनाची नवी लक्षणं आहेत,’ असे पंडित यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच डॉ. राहुल पंडित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती देत सरकारला सतर्कतेचे आवाहन केले होते.

कोरोनाची काही ठराविक लक्षणे अढळून आली होती. मात्र आता कोरोनाची नवी लक्षणे अढळून येत आसल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. कोरोनाव्यतिरिक्त अन्य व्हायरल इन्फेक्शन्सही अनेकांना होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी याची खबरदारी घेत काळजी घेणं महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!