पुणे – पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पुण्यात एका १४ वर्षीय मुलीवर तब्बल आठ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली असून, पीडित मुलीवर उपचार सुरू असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना, १४ वर्षीय पीडिता गावी जाण्यासाठी पुणे स्टेशन येथे गेली होती. तेथे एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवले. रिक्षाचालक अल्पवयीन मुलीला घेऊन थेट एका खोलीत गेला. तेथे सहा रिक्षाचालक व रेल्वेचे चतुर्थ श्रेणीतील २ कर्मचारी यांनी अमानुष कृत्य केले.
या घटनेची माहिती मिळताच,आम्ही रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे, आठही आरोपींना काही तासात ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे असे पोलिसांनी सांगितले. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच पीडित मुलीला रूग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिची तब्येत स्थिर असल्याचे वानवडी पोलिसानी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवात मुंबई, पुण्यात नवे निर्बंध ? मुख्यमंत्री निर्णय घेणार – मंत्री वडेट्टीवार
- संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले
- वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
