मुंबई : कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंग पावल्याचं स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली.
या निकालानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. ‘बेळगाव नगरपालिका निवडणूक ५८ जागा – भाजपा ३६, संज्या आणि शिवसेना (०) पुन्हा तोंडावर पडले; तुमची औकात काय आणि बोलता किती,’ अशी खोचक टीका निलेश राणे यांनी ट्विटर मार्फत केली आहे.
बेळगाव नगरपालिका निवडणूक ५८ जागा
भाजपा ३६
काँग्रेस ९
महा एकी समिती २
Mim १इतर,
संज्या आणि शिवसेना (०) पुन्हा तोंडावर पडले, तुमची औकात काय आणि बोलता किती.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 6, 2021
दरम्यान, यंदा पक्षीय पातळीवर लढवण्यात आली होती. यात भाजपला ५८ पैकी ३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्तास्थापनेचा पल्ला पार केला आहे. तर काँग्रेसच्या खात्यात १० जागा, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि उर्वरीत जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. बेळगाव महानगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवला. वैशाली भातकांडे, शिवाजी मांडोळकर, रवी साळुंके आणि बसवराज मोदगेकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्या तोच भगवा मुंबई महापालिकेवर फडकणारच’; नितेश राणेंचा विश्वास
- महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली; पुण्यात १४ वर्षीय मुलीवर आठ नराधमांनी केला बलात्कार
- दिलासादायक : कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘या’ औषधाच्या वापराला मंजुरी
- मिलिंद सोमणची रुग्णालयातील पोस्ट पाहून नेटकरी संतापले
- ‘एक अजनबी हसीना से…’; शशी थरूर यांच्या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद


